Breaking News
Home / News / निकालाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीला मिळाले एवढे गुण..

निकालाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीला मिळाले एवढे गुण..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.५३ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

पण आज निकालाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील बाभूळगावात एका बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरात आत्महत्या केली होती. आपण बारावीत नापास होऊ या भीतीने बाभुळगावातील चेतना सदानंद शिंगाडेनं काल आत्महत्या केली. आज बारावीचा निकाल लागला. त्यात चेतनाला ६२.४६ टक्के गुण मिळाले आहेत.

चेतनाने बिकट परिस्थितीमधून शिक्षण सुरु ठेवले होते. चेतनाचे आई वडील मजुरी करतात. चेतनानं टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी तिचे आई, वडील व कुटुंबातील सदस्य मजुरीसाठी गेले होते. तिच्या लहान बहिणी घरात होत्या. पण त्या बाहेर गेल्यानंतर चेतनानं घरातच गळफास लावला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकलं नाही. पण निकालाच्या भीतीनेच तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेतनानं नानीबाई घारफळकर विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. अभ्यासात हुशार असलेल्या चेतनानं हे टोकाचे पाऊल का उचललं असावं, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. चेतनानं काल (सोमवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास तिचा जीवनप्रवास संपवला.

तिच्या निकालानंतर मिळालेले मार्क बघून हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About thekhaasre

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *