Breaking News
Home / Inspiration / डोळ्यादेखत घातली गेली होती मोठ्या भावला गोळी, वेस्ट इंडिजच्या संघात पटकावले स्थान!

डोळ्यादेखत घातली गेली होती मोठ्या भावला गोळी, वेस्ट इंडिजच्या संघात पटकावले स्थान!

आयुष्य हे अनिश्चितीतेने भरलेले आहे. कुठे कधी कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल सांगता येत नाही. आयुष्यात नमके काय, कधी, कसं घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा एवढे भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात की, तुम्हाला काहीच करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहता.

अशीच एक गोष्ट एका क्रिकेटपटूच्या जीवनात घडली आहे. त्याने संकटांचा केलेला सामना आणि आज मिळवलेले यश खूप काही सांगून जाते. आयुष्यात बऱ्याच खडतर गोष्टींचा सामना करून हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आता इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे तो विश्वचषक खेळण्यासाठी. ही गोष्ट आहे वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसची.

वेस्ट इंडिजमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे. काही ठिकाणी राजरोसपणे गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळते. ओशाने आणि त्याच्या भावाचे खास नाते होते. पण त्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला. थॉमस जेव्हा अकरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डोळ्यादेखत मोठ्या भावला गोळी घातली गेली. ते दोघे कुठेही एकत्रच जायचे.

वय कमी असल्याने मोठ्या भावाला गोळी लागली तेव्हा नेमके काय करायचे हे ओशानेला समजले नाही. या प्रकरणात ओशानेच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला.

दुसऱ्यांदा आला वाईट अनुभव-

ओशाने जेव्हा २० वर्षांचा झाला तेव्हा तो जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे गेला. किंग्स्टनध्येही ओशानेला वाईट अनुभव आहे. ओशाने मार्केटमध्ये जाण्यासाठी घरून निघाला. रस्त्यात एका एटीएमजवळ उभ्या असलेल्या तीन जणांनी ओशानेला लुटले. यावेळी चोरांना ओशानेकडील पैसे, सोन्याची चेन आणि घड्याळ या गोष्टी लंपास केल्या.

या सर्व गोष्टींनंतरही ओशानेने हार मानली नाही. त्याने प्रामाणिकपणे मेहनत करत वेस्ट इंडिजच्या संघात स्थान पटकावले आणि आता गुणवत्तेच्या जोरावर विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About thekhaasre

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *